Pages

लेसन



लेसन



फु बाई फु फुगडी फु
दमलास का रं बाबा पाठ घेऊन तू रं
पाठ घेउन तू .........!! धृ.!!

सर म्हणे आमाले लेसन
 तुमचे घेवा लागते ,
सरन अस म्हणता माय 
डोस्क फिरू लागते
आता फुगडी फु ........!! १ !!

एक म्हणे मले तू 
काऊन एवढा भेत
म्या म्हणल त्याले 
आता कस सांगू इथ
आता फुगडी फु ........!! १ !!

सरपासून बचावून माय
 पाठ घेण ठरले
पण पाठ सुरू झाला 
तेव्हा सरच तिथे आले
आता फुगडी फु ........!! १ !!

सर म्हणे  घे  रे 
प्रश्न कौशल्याचा पाठ
प्रश्नांची उत्तर देता 
झाली माई वाट
आता फुगडी फु ........!! १ !!

होता राजा जेव्हा माया
 कथनाचा पाठ
कथन करता करता 
झालो मी बेजार
आता फुगडी फु ........!! १ !!

सर म्हणे आता 
घे रे प्रस्थावना
म्या म्हणल सरले 
आता तरी थांबून जाणा
आता फुगडी फु ........!! १ !!

सर म्हणे घे रे 
फलक लेखनाचा पाठ
पण माले नव्हता दाखावाचा 
माया अक्षराचा थाट
आता फुगडी फु ........!! १ !!

पोट्टे एचीबीन मधात 
भलत्या काड्या करे
पण मायाच वेळी काय सांगाव 
अस काऊन कार
आता फुगडी फु ........!! १ !!

निरीक्षक मागे बसून 
चुका माया काढे
त्या वाचवता माया 
नाकी नऊ आले
आता फुगडी फु ........!! १ !!

ग्रूप मधल्या पोरी माया 
ताल पाहून हासे
म्या म्हणले तिले बाई
 येले माय झाले
आता फुगडी फु ........!! १ !!

दादा कसे तरी घेतले 
म्या सारे माय पाठ
पाठ घेता घेता असा 
झाला माया थाट
आता फुगडी फु ........!! १ !!

दमलोस बाबा आता पाठ घेऊन मी रे ssss

नंदकिशोर फुटाणे