📊📊📊📊📊📊📊📊📊📊
💥 *विद्यार्थी विकास* 💥
👇
👇 👇
👇
💥 👉 *इलेक्ट्रॉनिक प्युरिफायर शिवाय करा पाणी शुद्ध*
नुकत्याच राज्यभर झालेल्या जोरदार पावसाने पाणी गढूळ व काही प्रमाणात दूषित झाले आहे. या दूषित पाण्याने कॉलरा, डायरिया व कावीळची साथ काही ठिकाणी वाढत आहे. या अशुद्ध पाण्याला शुद्ध करण्यासाठी अनेकजण लाईटवर अवलंबून असणाऱ्या प्युरिफायरचा पर्याय निवडतात. अशातच संपूर्ण महाराष्ट्रभर लोडशेडिंग चालू आहे. यामुळे आपल्याला 24 तास शुद्ध पाणी मिळू शकत नाही. म्हणून इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता देखील पाणी शुद्ध करायचे पर्याय उपलब्ध आहेत. कोणते आहेत हे पर्याय त्याबद्दल जाणून घेऊयात...
💥 👉 _*नॉन इलेक्ट्रिसिटी प्युरिफायर* :-
सध्या बाजारात असे काही प्युरिफायर्स उपलब्ध आहेत ज्यांना इलेक्ट्रिसिटीची गरज नसते. या प्युरिफायरमध्ये अॅक्टीव्हेट्स कार्बन आणि UF म्हणजेच अल्ट्राफिल्ट्रेशनच्या मदतीने पाणी स्वच्छ केले जाते. याद्वारे आपल्याला 24 तास शुद्ध पाणी मिळू शकते.
💥 👉 *फिल्टर्स* :-
प्युरिफायर्स प्रमाणे काम करणारे काही फिल्टर्स बाजारात उपलब्ध आहेत. असे फिल्टर्स तुम्ही नळाला लावून घेतल्यास पाणी गाळून आणि पाण्यातील किमान सौम्य प्रकारच्या जंतूंचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
💥 👉 *पाणी गाळणे* :-
तुम्हांला चांगल्या प्रतीच्या पाण्याचा पुरवठा होत असला तरीही किमान पावसाळ्याच्या दिवसात किंवा साथीच्या आजाराच्या दरम्यान पाणी कपड्याने किंवा गाळणीने गाळूनच मग स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरा.
💥 👉 *नळाला फडकं बांधा* :-
मातकट, पिवळसर पाण्याचा प्रवाह होत असेल तर नळाला आधीच स्वच्छ धुतलेले कापड बांधा. यामुळे पाणी गाळून येईल त्यानंतर तुम्ही ते पाणी उकळून पिऊ शकता.
💥 👉 *पाणी उकळणे* :-
पाणी उकळून पिणे फार महत्त्वाचे आहे. कारण यामुळे अनेक बॅक्टेरिया, त्रासदायक जंतू यांच्यापासून आपला बचाव होतो.
💥 👉 *तुरटी*:-
पाणी शुद्ध करण्यासाठी ते भांड्यात भरल्यानंतर त्यावर तुरटी फिरवा. म्हणजे गाळ खाली बसतो. मग उरलेले पाणी गाळून, उकळून पिण्यास सुरक्षित बनवता येते
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
🥀
█║▌│║║█║█║▌║║█║