Pages

youtube setting

आपण जेव्हा युट्युब ओपन करतो तेव्हा खूप वेळी अश्लील व हिंसक
व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीन वर
recommended केले जातात*
*पण जेव्हा आपण घरी किंवा शाळेत युट्युब ओपन करतो तेव्हा लहान मुले सुद्धा आपल्या सोबत
असल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो*
*या साठी आपल्याला अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घातला पाहिजे*
*आपण युट्युब संगणकावर व मोबाईल या दोन्ही ठिकाणी वापरत असतो त्यासाठी आपल्याला या दोन्ही
ठिकाणी काही setting कराव्या लागतील*
*१ ) संगणकावर setting करणे*
*सर्व प्रथम युट्युब ओपन करा*
*आपल्या समोर युट्युबची स्क्रीन येईल. स्क्रीन वर स्क्रोल करून सर्वात खाली जा*
*Restricted mode ऑफ असलेला दिसेल त्याच्यावर click करा*
*आपल्या समोर on व off असे ऑप्शन असतील आपण on या ऑप्शन समोरील वर्तुळावर click करा तेथे
काळा स्पॉट येईल*
*सर्वात खाली save हा ऑप्शन असेल त्याच्यावर click करा*
*अशा प्रकारे आपण restricted mode ओंन करू शकतो*
*२ ) मोबाईल वर setting करणे*
*सर्व प्रथम मोबाईल वर युट्युब ओपन करा*
*स्क्रीन वर उजव्या बाजूला वर तीन टिंब असतील त्याच्यावर click करा*
*सर्वात पहिला ऑप्शन settings वर click करा*
*आता पहिला ऑप्शन general येईल त्याच्यावर click करा*
*सहावा पर्याय restricted mode असेल त्याच्यावरील राखाडी रंगात असलेल्या पट्टीवरील गोल उजवी कडे
सरकवा त्या पट्टीचा व वर्तुळाचा रंग निळा झाला असेल*
*आता back या अशा प्रकारे मोबाईलवर restricted mode ऑन झाला असेल*
*या settings करून आपण सुमारे ९५% अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घालू शकतो व घरी, शाळेत युट्युब
बिनधास्त वापरू शकतो*
*धन्यवाद*


संकलन:-नंदकिशोर फुटाणे