Pages

मराठी फॉन्ट न वाचता येणे




*मराठी टायपिंग सॉफ्टवेअरद्वारे बनविलेला डॉक्यूमेंट इतर कॉम्प्युटर वर वाचण्याची समस्या*

 📊📊📊📊📊📊📊📊📊📊

         👇
 👇 👇
 👇

सध्या मराठी टायपिंग करण्यासाठी श्री लिपी, आकृती, कृती देव, आय लिप, एपीएस, लोकसत्ता फॉन्टफ्रिडम या सॉफ्टवेअर सोबत किरण, शिवाजी, सुशा व सुलभ इ. असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. या व अशा बर्‍याच मराठी टायपिंग सॉफ्टवेअर बनविणार्‍या कंपन्यांनी आपला स्वतःचा नविन कि-बोर्ड लेआऊट तयार केला आहे. कि-बोर्ड लेआऊट म्हणजे मराठी टायपिंग करण्यासाठी कि-बोर्डवर प्रत्येक निराळ्या बटणावर निराळा मराठी अक्षर दिलेला असतो.  तर निरनिराळ्या कि-बोर्ड लेआऊट निरनिराळ्या बटणावर निराळे मराठी अक्षर दिलेले असतो. सध्या मराठी मध्ये टायपिंगचे जवळपास १५-२० कि-बोर्ड लेआऊट बनलेले असून ते वापरले जात आहेत.

या निरनिराळ्या मराठी टायपिंग सॉफ्टवेअरची सर्वात मोठी समस्या ही की एका सॉफ्टवेअरमध्ये टाईप केलेला मजकुर दुसर्‍या सॉफ्टवेअरमध्ये उघडता येत नाही. म्हणजे मराठी टाईप केलेला मजकूर दिसत नसे. म्हणजेच एका ठिकाणी टाईप केलेला मजकूर दुसर्‍या ठिकाणी पहायचा असेल तर त्या दुसर्‍या ठिकाणी देखिल तोच सॉफ्टवेअर अथवा तोच वापरलेला फॉन्ट असणे आवश्यक असे. यामध्ये देखिल एक अडचण अशी असे की आपण जर त्या दुसर्‍या कॉम्प्युटरमध्ये फक्त फॉन्ट टाकला असेल तर आपण दुसर्‍या कॉम्प्युटरवर मराठी मजकूर फक्त पाहू शकतो पण त्यामध्ये फेरबदल करु शकत नाही. फेरबदल करण्यासाठी मग आपल्याला त्या दुसर्‍या कॉम्प्युटरवर पुर्ण सॉफ्टवेअर लोड करावे लागते.

अशा इतर मराठी टायपिंग सॉफ्टवेअर द्वारे टाईप केलेल्या एखाद्या मराठी माहितीपासून एखादे संकेतस्थळ बनवायचे झाल्यास इथे परत तोच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे दुसर्‍याच्या कॉम्प्युटरमध्ये तसाच मराठीचा सॉफ्टवेअर नसेल तेथे ती वेबसाईट दिसत नाही. कारण त्याच्या कॉम्प्युटरमध्ये संकेतस्थळावर वापरलेला मराठी फॉन्ट नसल्याने तेथे मराठी दिसत नसे. त्यात मराठीमध्ये बरेच मराठी टायपिंगचे सॉफ्टवेअर असल्याने सर्वांनाच त्यांच्या सॉफ्टवेअर पासून मराठी संकेतस्थळ बनविण्यात अडचण येत असे.

आपणास जर संकेतस्थळावर अशा इतर मराठी टायपिंग सॉफ्टवेअर द्वारे टाईप केलेले मराठी वापरायचे असेल तर मग एकच पर्याय असा की आपल्याला त्या मराठी अक्षरांन (इमेज) चित्र स्वरुपात म्हणजे JPG अथवा GIF करुन वापरता येते. कारण चित्र स्वरुपात बदलल्या नंतर तो फॉन्ट राहत नाही.

📊📊📊📊📊📊📊📊📊📊
  ■□■□■□■□■□■□■□■□■□■□■□■□■