Pages

स्मार्टफोन स्क्रॅच व उपाय



विद्यार्थी विकास
👇
 👇
 👇 👇


👉 _*मोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅच आणि उपाय*_

_*Lets Up Faide Ki Baat*_

स्मार्टफोन आल्यापासून सगळेच स्मार्ट झालेत. मात्र कधी धावपळीच्या नादात तर कधी पाकिटात ठेवताना, आपला मोबाईल खाली पडल्याच्या घटना कित्येवेळेस घडल्या असतील. यामुळे मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडतात. कधी-कधी तर स्क्रॅच गार्ड बदलावे लागते. मात्र हा खर्चिक उपाय करण्यापेक्षा मोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅचेस जर हलके असतील तर तुम्ही घरच्या घरी ते हटवू शकता, ते कसे याबद्दल जाणून घेऊयात...

1) तुम्ही बेकिंग सोडाच्या वापरानेही स्क्रीनवरील स्क्रॅचेस हटवू शकता. त्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळून ते मिश्रण स्क्रॅचवर लावा आणि कपड्याने पुसून टाका.

2) स्मार्टफोनची स्क्रीन साफ करण्यासाठी तुम्ही व्हेजिटेबल ऑईलचाही वापर करु शकता. मात्र लक्षात ठेवा, तेल जास्त झाले तर मोबाईलची स्क्रिन ऑईली होवू शकते. तसेच ऑईल मोबाईलच्या स्क्रिनच्या आत जाणार नाही याचीही काळजी घ्या.

3) स्क्रीनवरील स्क्रॅचेस मिटवण्यासाठी व्हॅसलीनचाही वापरही तुम्ही करू शकता. मात्र व्हॅसलीन जास्त जोराने स्क्रिनवर रगडू नका.

4) जर स्क्रीनवरील स्क्रॅच हलका असेल तर तुम्ही पेन्सिल इरेझरचाही वापर करू शकता. यासाठी कॉटनचे कापड ओले करून स्क्रिनवर पसरवून घ्या. स्क्रिन कोरडी झाल्यानंतर पेन्सिल इरेझर वापरा. मात्र पेन्सिल इरेझर हे स्वच्छ असायला हवे.

5) बाजारात उपलब्ध असलेल्या कार स्क्रॅच रिमूव्हर क्रीमही तुम्ही मोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅचेस घालवण्यासाठी वापरु शकता.

6) सँडपेपरचा वापरही तुम्ही स्क्रॅचेस घालवण्यासाठी करु शकता. मात्र ध्यानात ठेवा की, प्लास्टिक फ्रेम अथवा ग्लॉसी बॅक कव्हरसाठी सँडपेपरचा वापर करु नका.

7) जर स्क्रिनवरील स्क्रॅच हलके असतील तर तुम्ही टूथपेस्टची मदत घेऊ शकता. यासाठी कापूस घ्या त्यावर टूथपेस्ट लावून स्क्रिनवर पसरवून घ्या. यानंतर नरम कपड्याच्या मदतीने स्क्रिन स्वच्छ करा. तुमच्या मोबाईल स्क्रिनवरील स्क्रॅच गायब झालेले असतील.

8) तुम्ही बेबी पावडरचाही उपयोग करू शकता. त्यासाठी पावडरमध्ये थोडे पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर कॉटनच्या कपड्याच्या मदतीने स्क्रिनवर पसरवा आणि स्क्रिन स्वच्छ करा.

*टिप* : जर तुमचा फोन टच स्क्रिनवाला असेल आणि त्यात ओलियोफोबिक कोटिंग असेल तर या ट्रिक्स वापरू नका. कारण असे केल्याने तुमच्या फोनवरील कोटिंग निघून जाईल. यामुळे स्क्रॅच अजून गडद होईल व स्क्रिनचे प्रोटेक्शन पण हटेल.


█║▌│║║█║█║▌║║█║