👉 *डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयीफार कमी माहीत असणाऱ्या गोष्टी*
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
🥀
💥 *विद्यार्थी विकास* 💥
👇
👇 👇
👇
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम येथील एका खेड्यात कलाम यांचा जन्म झाला होता. एका नावाड्याच्या घरात जन्मलेल्या कलाम यांनी अविरत मेहनत घेत विज्ञान क्षेत्रात भारताचा झेंडा रोवला. म्हणून आज त्यांच्या विषयी रंजक व ज्ञानवर्धक थोडं जाणून घेऊ...
👉 अब्दुल कलाम भारताच्या दोन मोठ्या यंत्रणांचे, अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)चे प्रमुख होते.
👉 भारताच्या मिसाइल कार्यक्रमाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. भारताचे पहिले रॉकेट एसएलव्ही-3 बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) बनवण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.
👉 भारताचे पहिले क्षेपणास्त्र ‘पृथ्वी’ आणि त्यानंतर ‘अग्नी’ क्षेपणास्त्र बनवण्यातही डॉक्टर अब्दुल कलाम यांचे मोलाचे योगदान होते.
👉 भारताने 1998 मध्ये अण्वस्त्र चाचणी केली होती, त्यातही डॉ. कलाम यांची भूमिका महत्वाची होती कारण त्यावेळी ते डीआरडीओचे प्रमुख होते.
👉 डॉ. कलाम यांना त्यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान मिळणाऱ्या भेटवस्तूंचा स्वीकार करत पण पुन्हा भारतात परतल्यावर त्या भेटवस्तूंचा फोटो काढून त्यांची यादी बनवून घेत आणि त्या वस्तू राष्ट्रपती भवनातील संग्रहालयाकडे सोपवत असत.
👉 कलाम सर जेव्हा सेवानिवृत्त झाले त्यावेळी राष्ट्रपती भवनातून बाहेर पडताना एक पेन्सिलही सोबत घेतली नाही. सगळ्या भेटवस्तू संग्रहालयातच राहिल्या.
👉 राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यावर साधेपणामुळे ते ओळखले जात होते. सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ते ओळखले जायचे.
👉 कलाम यांचे ‘*अग्निपंख*’ हे पुस्तक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या भाषणांनी ते तरुणांमध्ये नवी उमेद जागी करत असत.
*डॉ. कलाम यांचे प्रेरणादायी विचार*
👉 आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.
👉 देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.
👉 तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.
👉 जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.
👉 यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.
👉 यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.
👉 स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.
👉 एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.
भारताच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका साकारणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे वयाच्या 86 व्या वर्षी 27 जुलै 2015 रोजी निधन झाले.
🥀🌼💠■■💠🌼🥀
📊📊📊📊📊📊📊📊📊📊
●█║▌│║║█║█║▌║║█║●