Pages

Google सेवा




Google सेवा अटी

अखेरचे सुधारित: १४ एप्रिल २०१४ ( संग्रहीत आवृत्त्या पहा)

Google वर आपले स्वागत आहे!

आमची उत्पादने आणि सेवा वापरण्यासाठी धन्यवाद (“सेवा”). सेवा 1600 Amphitheatre Parkway,

Mountain View, CA 94043, United States येथे वसलेल्या Google Inc. (“Google+”) कडून प्रदान करण्यात

येतात.

आमच्या सेवा वापरून, आपण या अटी मान्य करता. कृपया हे लक्षपूर्वक वाचा:

आमच्या सेवा अत्यंत विविधतापूर्ण आहेत, त्यामुळे काहीवेळा अतिरिक्त अटी किंवा उत्पादन आवश्यकता

(वयाच्या आवश्यकतांसह) लागू होऊ शकतात. अतिरिक्त अटी संबंधित सेवांसह उपलब्ध केल्या जातील

आणि आपण या सेवा वापरत असल्यास आमच्याबरोबर आपण केलेल्या आपल्या कराराचा अशा

अतिरिक्त अटी भाग होतील.

आमच्या सेवा वापरणे

सेवांदरम्यान आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही धोरणांचे आपण अनुसरण केलेच पाहिजे.

आमच्या सेवांचा गैरवापर करू नका. उदाहरणार्थ, आमच्या सेवांमध्ये हस्तक्षेप करू नका किंवा आम्ही

प्रदान करत असलेल्या इंटरफेस आणि सूचनांऐवजी एखादी पद्धत वापरून त्या सेवा उपलब्ध करून

घेण्यास प्रयत्न करू नका. आपण केवळ कायद्याने परवानगी दिलेल्या, लागू असलेल्या निर्यात आणि

पुनर्नियात नियंत्रण कायदा आणि नियमांसह असलेल्या आमच्या सेवांचा वापर करू शकता. आपण

आमच्या अटी किंवा धोरणांचे पालन करत नसल्यास किंवा आम्हाला गैरवर्तनाचा संशय आल्यास आम्ही

आपल्याला आमच्या सेवा प्रदान करणे निलंबित करू किंवा थांबवू शकू.

आमच्या सेवा वापरणे आपल्याला आमच्या सेवांमधील किंवा आपण उपलब्ध करून घेत असलेल्या

सेवांतील कोणत्याही बौद्धिक मालमत्तेचे मालकी अधिकार देत नाही. आपण आमच्या सेवांमधील सामग्री

आपल्याला त्यांच्या मालकाची किंवा कायद्याची परवानगी मिळेपर्यंत वापरू शकत नाही. या अटी

आपल्याला कोणतीही ब्रॅण्डींग किंवा आमच्या सेवांमध्ये वापरलेले लोगो वापरण्याचा अधिकार देत नाहीत.

आमच्या सेवांमध्ये किंवा सेवांसह प्रदर्शित झालेल्या कोणत्याही कायदेशीर सूचना काढू नका, अस्पष्ट करू

नका किंवा बदलू नका.

Google ची नसलेली काही सामग्री आमच्या सेवा प्रदर्शित करतात. ही सामग्री ती उपलब्ध करुन देणार्या

घटकाची पूर्ण जबाबदारी असते. आम्ही सामग्री बेकायदेशीर किंवा आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारी

आहे काय ते निश्चित करण्यासाठी तिचे पुनरावलोकन करू शकतो, आणि आम्हाला आमच्या धोरणांचे

किंवा कायद्याचे उल्लंघन करत आहे असे वाटत असलेल्या सामग्रीला प्रदर्शित करणे नाकारू शकतो किंवा

तिला काढू शकतो. परंतु हे आवश्यक नाही की आम्ही सामग्री मधील मुद्यांचे पुनरावलोकन करू तो,

म्हणून कृपया आम्ही हे करू असे गृहित धरू नका.

आपल्या सेवांच्या वापराच्या संबंधात, आम्ही आपल्याला सेवा घोषणा, प्रशासकीय संदेश आणि इतर

माहिती पाठवू शकतो. आपण त्यापैकी काही संप्रेषणांची निवड रद्द करू शकता.

आमच्या काही सेवा मोबाइल डिव्हाइसेसवर उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या सेवा वापरू नका ज्या रहदारी

किंवा सुरक्षितता कायद्यांचे पालन करण्यापासून आपल्याला विचलित करतात आणि प्रतिबंध करतात.

आपले Google खाते

आमच्या काही सेवांचा वापर करण्यासाठी आपल्याला Google खात्याची आवश्यकता पडू शकते. आपण

स्वत: आपले Google खाते तयार करू शकता, किंवा आपल्या प्रशासक किंवा शैक्षणिक संस्थेकडून आपले

Google खाते आपल्याला हस्तांतरित केले जाईल. आपण प्रशासकाद्वारे आपल्यासाठी नियुक्त केलेले

Google खाते वापरत असल्यास, भिन्न किंवा अतिरिक्त अटी लागू होऊ शकतात आणि आपला प्रशासक

आपल्या खात्यात प्रवेश करू शकतो किंवा ते रद्द(अक्षम) करू शकतो.

आपले Google खाते संरक्षित करण्यासाठी, आपला संकेतशब्द गोपनीय ठेवा. आपल्या Google खात्यावर

किंवा त्याद्वारे होणार्या गतिविधीसाठी आपण जबाबदार आहात. तृतीय-पक्ष अनुप्रयोगांवर आपला Google

खाते संकेतशब्द पुन्हा न वापरण्याचा प्रयत्न करा. आपण आपल्या संकेतशब्दाचा किंवा Google खात्याचा

कोणताही अनधिकृत वापर जाणून घेतल्यास, या सूचनांचे अनुसरण करा .

गोपनीयता आणि कॉपीराइट संरक्षण

आपण आमची सेवा वापरता तेव्हा Google ची गोपनीयता धोरणे आम्ही आपला वैयक्तिक डेटा कसा

हाताळतो आणि आपल्या गोपनीयतेचे रक्षण कसे करतो हे स्पष्ट करतात. आमच्या सेवा वापरून, आपण

यास संमती देता की Google स्वतःच्या गोपनीयता धोरणांनुसार असा डेटा वापरू शकते.

आम्ही कॉपीराइट उल्लंघन आरोपाच्या सूचनांना प्रतिसाद देतो आणि U.S. Digital Millennium Copyright

Act मध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार वारंवार उल्लंघन करणार्यांचे खाते रद्द(बंद) करतो.

कॉपीराइट धारकांना त्यांच्या बौद्धिक मालमत्तेस ऑनलाइन व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी

आम्ही माहिती प्रदान करतो. कोणीतरी आपल्या कॉपीराइटचे उल्लंघन करीत आहे असे आपल्याला वाटत

असेल आणि आम्हाला सूचित करण्याची इच्छा असेल तर, सूचना आमच्याकडे दाखल करणे आणि

सूचनांना प्रतिसाद देण्याच्या Google च्या धोरणाबद्दलबद्दल आमच्या मदत केंद्रात माहिती प्राप्त करु

शकता.

आमच्या सेवांमधील आपली सामग्री

आमच्या काही सेवा आपल्याला सामग्री अपलोड, सबमिट, संचयित करण्यास, पाठविण्यास किंवा प्राप्त

करण्यास अनुमती देतात. त्या सामग्रीमध्ये आपल्याकडे असलेल्या कोणत्याही बौद्धिक मालमत्तेच्या

अधिकारांची मालकी आपल्याजवळ राहील. थोडक्यात, आपल्या मालकीचे जे आहे ते आपलेच रहाते.

आपण जेव्हा आमच्या सेवांवर किंवा त्यांच्या द्वारे सामग्री अपलोड, सबमिट, संचयित करता, पाठविता

किंवा प्राप्त करता, तेव्हा आपण Google (आणि आम्ही कार्य करतो त्यांच्यासह) ला वापरण्यास, होस्ट

करण्यास, संग्रहित करण्यास, पुनरूत्पादन करण्यास, सुधारण्यास, साधित कार्ये (अनुवाद, रूपांतरणे किंवा

आम्ही करत असलेले इतर बदल जेणे करून आपली सामग्री आमच्या सेवांसह चांगले कार्य करेल), तयार

करण्यास, प्रक्षेपित करण्यास, प्रकाशित करण्यास़, सार्वजनिकपणे कार्यप्रदर्शन करण्यास, सार्वजनिकपणे

प्रदर्शित करण्यास आणि अशा सामग्रीचे वितरण करण्यास जागतिक स्तरावर परवाना देता. आपण या

परवान्यात मंजूर केलेले अधिकार आमच्या सेवा ऑपरेट करणे, प्रचालित करणे आणि सुधारण्यासाठी

तसेच नवीन सेवा विकसित करण्यासाठी मर्यादित आहेत. आपण आमच्या सेवा वापरणे थांबवले तरी

परवाना चालू रहातो (उदाहरणार्थ Google Maps वर आपण जोडलेल्या व्यावसायिक सूची). काही सेवा

आपल्याला त्या सेवांनी पुरविलेल्या सामग्रीवर प्रवेश करणे आणि ती हटविण्यास वाव देऊ शकतात. तसेच,

आमच्या काही सेवांमध्ये अशा अटी किंवा सेटिंग्ज आहेत ज्या अशा सेवांमध्ये सबमिट केलेली सामग्री

वापरण्याचा आमचा वापर मर्यादित करतात. आपण आमच्या सेवेत प्रस्तुत करणार्या कोणत्याही

सामग्रीसाठी हा परवाना देण्याकरिता आपल्याकडे आवश्यक अधिकार आहेत याची खात्री करा.

सानुकूलित शोध परिणाम, जोडलेल्या जाहिराती आणि स्पॅम आणि मालवेअर शोध यासारखी वैयक्तिक

संबंधित उत्पादन वैशिष्ट्ये आपल्याला प्रदान करण्यासाठी आमची स्वयंचलित प्रणाली आपल्या सामग्रीचे

(ईमेलच्या समावेशासह) विश्लेषण करते. हे विश्लेषण सामग्री पाठविल्यावर, प्राप्त केल्यावर आणि ती

संचयित केल्यावर केले जाते.

आपल्याकडे एक Google खाते असल्यास, आम्ही जाहिरातींमध्ये आणि इतर व्यावसायिक संदर्भांमध्ये

प्रदर्शित करण्यासह, आमच्या सेवांमध्ये, आपले प्रोफाईल नाव, प्रोफाईल फोटो आणि Google वर किंवा

आपल्या Google खात्याशी कनेक्ट केलेल्या तृतीय-पक्ष अनुप्रयोगांवर आपण करता त्या क्रिया प्रदर्शित करू

शकतो (जसे की +1, आपण लिहिता ती पुनरावलोकने आपण पोस्ट करता त्या टिप्पण्या). आपल्या

Google खात्यातील सामायिकरण किंवा दृश्यमानता सेटिंग्जवर मर्यादा घालण्यासाठी आपण करता त्या

निवडींचा आम्ही आदर करू. उदाहरणार्थ, आपण आपल्या सेटिंग्ज निवडू शकता जेणेकरून आपले नाव

आणि फोटो जाहिरातीमध्ये दिसत नाही.

विशिष्ट सेवांसाठी अतिरिक्त अटीं किंवा गोपनीयता धोरणामधील सामग्रीचा Google कसा वापर करते

आणि तिचा कसा संग्रह करते याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल. आपण आमच्या

सेवांबद्दल अभिप्राय किंवा सूचना पाठविल्यास, आम्ही आपला अभिप्राय आणि सूचना आपल्या कोणत्याही

बंधनाशिवाय वापरु.

आमच्या सेवांमधील सॉफ्टवेअरविषयी

जेव्हा सेवेला डाउनलोड करण्यायोग्य सॉफ्टवेअर आवश्यक असते किंवा त्याचा त्या सेवेत समावेश असतो,

तेव्हा नवीन आवृत्ती किंवा वैशिष्ट्य एकदा उपलब्ध झाल्यास हे सॉफ्टवेअर स्वयंचलितपणे आपल्या

उपकरणावर अद्ययावत(अपलोड) करेल. काही सेवा आपल्याला आपल्या स्वयंचलित अद्ययावत(अपलोड)

सेटिंग्ज समायोजित करू देतात.

सेवांचा भाग म्हणून Google द्वारे आपल्याला प्रदान करण्यात आलेले सॉफ्टवेअर वापरण्यासाठी एक

वैयक्तिक, जागतिक, विना-मानधन, अनिश्चित आणि हस्तांतर न करण्यायोग्य आणि एकाधिकार नसलेला

परवाना Google आपल्याला देते. या परवान्याचा एकमात्र उद्देश, या अटींद्वारे अनुमत पद्धतींनुसार

Google द्वारे प्रदान केल्या जाणार्या सेवांचे लाभ वापरण्यासाठी आणि त्यांचा आनंद घेण्याच्या हेतूने

आपल्याला सक्षम करणे हा आहे. त्या निर्बंधांवर कायदे प्रतिबंध घालेपर्यंत किंवा आपल्याकडे आमची

लिखित परवानगी असेपर्यंत आपण आमच्या सेवांच्या कोणत्याही भागाची किंवा समाविष्ट असलेल्या

सॉफ्टवेअरची कॉपी, सुधारणा, वितरण, विक्री करू शकत नाही किंवा त्यांना भाडेपट्टीने देऊ शकत नाही,

तसेच आपण प्रति-अभियांत्रिकी कृती किंवा सॉफ्टवेअरचा स्रोत कोड काढून घेण्याचा प्रयत्नही करू शकत

नाही.

मुक्त स्रोत सॉफ्टवेअर आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करणार असलेल्या

मुक्त परवान्याच्या अंतर्गत आमच्या सेवांमध्ये वापरण्यात येत असल्यास काही सॉफ्टवेअर उपलब्ध करून

दिले जाऊ शकते. मुक्त स्रोत परवान्यामधे अशा तरतूदी असू शकतात की ज्या काही अटींपेक्षा स्पष्टपणे

वरचढ समजल्या जातील.

आमच्या सेवा सुधारित करणे आणि संपुष्टात आणणे

आम्ही आमच्या सेवा सतत बदलत आणि सुधारत असतो. आम्ही कार्यपध्दती किंवा वैशिष्टये वाढवू किंवा

काढू शकतो, आणि आम्ही सेवा निलंबित करू किंवा थांबवू शकतो.

आपण कोणत्याही वेळी आमच्या सेवांचा वापर करणे थांबवू शकता परंतु आम्हाला त्याबाबत दिलगिरी

वाटेल. Google आपल्याला सेवा देणे किंवा वाढवणे थांबवू शकतो किंवा कधीही आमच्या सेवांवर नवीन

मर्यादा घालू शकतो.

आपण आपल्या डेटाचे मालक असणे आणि अशा डेटाची आपल्याला उपलब्धता संरक्षित केली जाणे हे

महत्वपूर्ण आहे असा आमचा विश्वास आहे. आम्ही सेवा खंडित केल्यास, जिथे कारण देणे शक्य असेल

तिथे आम्ही आपल्याला रास्त आगाऊ सूचना देऊ आणि त्या सेवेमधून माहिती प्राप्त करण्याची संधी देऊ.

आमची हमी आणि अस्वीकरणे(डिसक्लेमर)

आम्ही व्यावसायिक कौशल्य आणि काळजी वापरून आमच्या सेवा प्रदान करतो आणि आपण त्या वापरून

आनंदित व्हाल अशी आम्हाला आशा आहे. परंतु आम्ही आमच्या सेवांविषयी वचन देत नाही अशाही काही

विशिष्ट गोष्टी आहेत.

या अटी किंवा अतिरिक्त अटींमध्ये सुस्पष्ट केले आहे ते वगळता GOOGLE किंवा त्याचे पुरवठादार किंवा

वितरक सेवांबाबत कोणतीही विशिष्ट वचने देत नाहीत. उदाहरणार्थ, आम्ही सेवांमधील सामग्रीबद्दल,

सेवांच्या विशिष्ट कार्याबद्दल किंवा त्यांच्या विश्वसनीयता, उपलब्धता किंवा आपल्या गरजा पूर्ण

करण्याची क्षमता या बद्दल कोणतीही वचनबद्धता करत नाही. आम्ही या सेवा “जशा आहेत तशा” प्रदान

करतो.

काही अधिकारक्षेत्रे दुय्यम अटी(आश्वासने) याचे हक्क देतात. उदाहरणार्थ वस्तू व्यापारयोग्य असणे,

एखाद्या विशिष्ट हेतूसाठी योग्य असणे, उल्लंघन प्रतिबंधता.. कायद्याने परवानगी असलेल्या मर्यादेपर्यंत,

आम्ही सर्व दुय्यमअटी(आश्वासने)(हमी) वगळतो.

आमच्या सेवांचे उत्तरदायित्त्व

कायद्याद्वारे परवानगी असल्यानंतर, GOOGLE आणि GOOGLE चे पुरवठादार आणि वितरक, गमावलेला

नफा, महसूल, किंवा डेटा, आर्थिक नुकसान किंवा अप्रत्यक्ष, विशिष्ट, परिणामस्वरूप, किरकोळ, किंवा

दंडात्मक नुकसानासाठी जबाबदार असणार नाही.

कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, GOOGLE आणि त्याचे पुरवठादार आणि वितरक यांचे एकूण

उत्तरदायित्त्व, या अटींखालील अध्याहत दुय्यमअटी कोणत्याही दाव्यासाठी सेवा वापरण्याकरिता आपण

आम्हाला अदा केलेल्या रकमेपर्यंत मर्यादित आहे (किंवा आम्ही निवड केल्यास, आपल्याला पुन्हा सेवा

देण्यापर्यंत).

सर्व बाबतीत, GOOGLE आणि त्याचे पूरवठादार तसेच वितरक तार्किकदृष्ट्या अंदाज लावता न येणार्या

नुकसान किंवा क्षतीसाठी जबाबदार नाहीत.

आमच्या सेवांचा व्यवसायिक वापर

आपण एखाद्या व्यवसायाच्या वतीने आमच्या सेवा वापरत असल्यास, तो व्यवसाय या अटी स्वीकारतो.

ते Google आणि त्याचे संबंधित, अधिकारी, एजंटस आणि कर्मचार्यांना कोणताही दावा, खटला किंवा

सेवांच्या वापरातून उद्भवणार्या किंवा या अटींच्या उल्लंघनाच्या बाबतीत उद्भवणारे कोणतेही

उत्तरदायित्त्व, किंवा दावा, नुकसान, क्षती, खटले, निकाल, न्यायनिर्णयाचे खर्च आणि वकीलांचे शुल्क

यांपासून संबंधित कारवाईविरोधात अक्षत आणि क्षतिपूर्त ठेवील.

या अटींबद्दल

आम्ही या अटी किंवा कोणत्याही अतिरिक्त अटी ज्या सेवेला लागू होतात त्या सुधारित करू शकतो,

उदाहरणार्थ, कायद्याचे बदल किंवा आमच्या सेवेचे बदल प्रतिबिंबित करणे. आपण नियमितपणे अटींकडे

पहावे. आम्ही या पृष्ठावर या अटींच्या सुधारणांची सूचना पोस्ट करू(पाठवू). लागू करण्यायोग्य सेवेमध्ये

आम्ही सुधारित अतिरिक्त अटींबद्दल सूचना पोस्ट करू(पाठवू). बदल गतकाळाला लागू होणार नाहीत

आणि ते पोस्ट केल्यानंतर(पाठविल्यानंतर) चौदा दिवसांच्या अगोदर प्रभावी होणार नाहीत. तथापि, एका

सेवेच्या नवीन कार्यांना अनुलक्षून असलेले बदल किंवा कायदेशीर कारणांसाठी केलेले बदल तत्काळ प्रभावी

होतील. आपण सेवेकरिता सुधारणा केलेल्या अटींशी सहमत नसल्यास, आपण त्या सेवेचा आपला वापर

करणे खंडित करावा.

या अटी आणि अतिरिक्त अटीं दरम्यान विरोध असल्यास, अतिरिक्त अटी लागू होतील व असा विरोध

नियंत्रणात आणतील.

या अटी Google आणि आपल्या दरम्यानचा संबंध नियंत्रित करतात. या अटी कोणतेही तृतीय पक्ष

लाभार्थी अधिकार तयार करीत नाहीत.

आपण या अटींचे पालन न केल्यास आणि आम्ही लगेच कारवाई न केल्यास, याचा असा अर्थ होत नाही

की आम्ही आम्हाला असलेले कोणतेही अधिकार (जसे की भविष्यात कारवाई करणे) सोडून दिले आहेत.

एखादी अट जर अंमलबजावणी करण्यायोग्य नसल्याचे आढळून आले, तर यामुळे कोणत्याही इतर अटींना

बाधा पोहोचणार नाही.

कॅलिफोर्नियामधील कायद्यांमधील वादाबाबतचे नियम (conflict of laws rules) वगळता कॅलिफोर्निया,

यू.एस.ए. तील कायदे या अटीमधून किंवा सेवांशी संबंधित असणार्या वादांसाठी लागू होतील. या अटी

किंवा अटींशी संबंधित किंवा सेवेशी संबंधित उद्भवणारे सर्व दावे फक्त Santa Clara County, California,

USA च्या फेडरल किंवा राज्य न्यायालयात केले जातील आणि आपण आणि Google यांची न्यायालयांमध्ये

वैयक्तिक अधिकारक्षेत्रासाठी मान्यता राहिल.


संकलन :- नंदकिशोर फुटाणे