Pages

ट्विटर - आपल्याला हवे ते बोला !

ट्विटर - आपल्याला हवे ते बोला !

ट्विटर - आपल्याला हवे ते बोला !

जिभेला हाड नसते - ही आपल्या कडील एक म्हण. म्हणजे

बोलणारा त्याच्या मनाला वाट्टेल ते बोलू शकतो. मग ऐकणार्‍यांना ते

आवडो वा न आवडो. लोकशाही असल्याने आता प्रत्येकाला बोलण्याचा

आणि आपले व्यक्तिगत विचार मांडण्याचे स्वातंत्र आहे.

अशाच प्रकारचे इंटरनेटवरील बोलण्याचे प्रत्येकाच स्वतःचे व्यासपिठ

म्हणजे ट्विटर.

ट्विटर हा देखिल सोशल नेटवर्किंग व मायक्रो-ब्लॉगिंगचाच एक प्रकार.

म्हणजेच कोणताही आर्थिक हेतू नसलेली स्वतःचे मोफत व्यासपिठ देणारे

लहान प्रकारची एक नोंदवही.

ट्विटर हा चिवचिवाट करणार्‍या एका पक्षाचे नाव, जसे आपल्या इथे

सतत चिवचिवाट करणारी चिमणी. जशी चिमणीची चिवचिव सतत चालू

असते आणि तिला कुणीही थांबवू शकत नाही. त्याच प्रमाणे आपण

ट्विटरच्या संकेतस्थळावर आपल्याला हवे ते लिहू शकतो.

काहीही लिहिण्याची मुभा इथे जरी असली तरी लिहिण्याची मर्यादा फक्त

१४० अक्षरांचीच आहे. म्हणजे आपण आपल्याला हवे ते लिहा पण फक्त

अक्षरांमध्येच. जशी मर्यादा आपल्या मोबाईलच्या एसएमएस मध्ये असते

तशी.

इथे आपण आपला संदेश सर्वांसाठी खुला अथवा अथवा फक्त आपल्या

मित्रमैत्रीणींनाच वाचता येईल अशी सोय आहे. असे करताना आपण

आपली माहिती इथे गुप्त देखिल ठेवू शकतो.

ट्विटरवर 'फॉलोवर्स' हा एक प्रभावी उपक्रम आहे. म्हणजे आपण

ट्विटरवर आपले खाते उघडल्यानंतर आपल्या खात्याचे जेवढे 'फॉलोवर्स'

असतील त्यांना आपण ट्विटरवर केलेल्या चिवचिवाटाची म्हणजेच

लिहिलेल्या संदेशाची प्रत आपोआप मिळते या 'फॉलोवर्स' नाच आपण

आपली पाठपुरवठा करणारे म्हणू शकतो. जे आपल्या संदेशांमध्ये रस

असेल.

ट्विटर कसे वापराल ?

ट्विटर वर काहिही लिहिण्यासाठी प्रथम आपल्याला तेथे त्यांच्या

संकेतस्थळावर प्रवेश (म्हणजेच साईन-इन) करावे लागेल, जर आपण

ट्विटर वर आपले खाते या आधी उघडले नसेल तर आपले नविन खाते

उघडावे लागेल.

ट्विटर वर नविन खाते उघडण्यासाठी फक्त इतकेच करायचे आहे की

त्यांच्या www.twitter.com संकेतस्थळ चालू करा. आता उजव्या बाजूच्या

जागेतील साईन-अप ( Sign Up ) या बटणावर क्लिक करा.

आता समोर आलेल्या पानावर विचारलेली Full name, Username,

Password, Email म्हणजेच आपले पूर्ण नाव, हवे असलेले खात्याचे नाव,

पासवर्ड आणि ई-मेल टाईप करुन खालील " Create my account "

बटणावर क्लिक करा.

या नंतर ट्विटर आपल्याला कुठल्या विषयामध्ये ' Interest ' म्हणजेच

रस आहे ते विचारले इथे ते न देता देखिल आपण खालील " Next Step:

Friends >> " बटणावर क्लिक करु शकता.

इथे आपल्या ई-मेल खात्यातील आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या जोडायचे

आहे का ते विचारले जाईल. इथे देखिल खालील " Skip import " या

बटणावर क्लिक करुन त्यावर दुर्लक्ष करु शकता.

आणि बस्सा. इतकेच करायचे आहे. या दोन विभागांनतर आपण

लगेचच ट्विटर संकेतस्थळावर आपली चिवचिव करु शकता म्हणजेच

आपला संदेश १४० अक्षरांमध्ये लिहू शकता. आपण ' What's

happening? ' या जागेमध्ये आपल्याला हवे ते लिहू शकतो.

ट्विटरच्या थोडक्यात काही विशेष गोष्टी

१. थोडक्यात म्हणजे १४० अक्षरांमध्ये मर्यादीत पण प्रभावी बोलण्याची

मुभा.

२. आपण आपल्या आवडीच्या विषयावर इतर काय बोलत आहेत ते

पाहू शकता.

३. इथे देखिल ' People ' या विभागाद्वारे आपण आपल्या ओळखीच्या

व्यक्तिंना शोधू शकता.

४. आपले खाते सर्वांसाठी खुले अथवा खाजगी म्हणजे इतर बाहेरील

कुणीच पाहू शकत नाही असे ठेवू शकता.

५. आपण बोललेल्या विषयासारखेच इतर कुणाचा तसाच संदेश

असल्यास पाहता येते.

६. सध्या बर्‍याच मोबाईलद्वारे देखिल GPRS या सेवेद्वारे आपण

ट्विटरवर लिहू शकता.

संकलान :- नंदकिशोर फुटाणे