Pages

शॉर्टकट




👉 _*'हे' शॉर्टकट तुमचा वेळ वाचवतील?*_


संगणक, कीबोर्ड आणि माउस यांचं अतूट असं नातं आहे. संगणकाला आदेश देण्यासाठी कीबोर्ड आणि माऊसचा आपण वापर करत असतो. माउस जर बंद पडलं तर आपण परेशान होतो अशावेळी किबोर्डचा वापर फक्त टायपिंगसाठी न करता त्यातील काही शॉर्टकट वापरुन आपण आपला वेळ वाचवू शकतो. म्हणून कीबोर्ड शॉर्टकट महत्वाच्या ठरतात. म्हणूनच महत्वाच्या शॉर्टकीवर नजर टाकुयात...

👉 _*Alt + Tab*_ : आपण जर एकाचवेळी अनेक साईट, सॉफ्टवेअर्स वापरत असाल तर या शॉर्टकटचा वापर करुन आपण एका साईट किंवा सॉफ्टवेअरवरुन दुसरे बॅकग्राऊंडला सुरू असणारी साईट किंवा सॉफ्टवेअर उघडू शकता.

👉 _*Ctrl + Shift + Esc*_ : संगणक हँग झाल्यावर या शॉर्टकटचा वापर करुन आपण टास्क मॅनेजर थेट उघडू शकतो. टास्क मॅनेजरमधून कोणता प्रोग्राम चालत नाही याची माहिती घेऊन तो बंद करु शकतो.


👉 _*Shift + Delete*_ : आपणला जर कोणतीही फाईल कायमची डिलीट कराची असेल तर आपण या शॉर्टकटचा वापर करुन ती कायमची डिलीट करु शकतो.

👉 _*Windows logo key + L*_ : या शॉर्टकटद्वारे आपण संगणक लॉक करु शकतो. जेणेकरुन आपल्या अनुपस्थितीत त्याचा कोणी गैरवापर करणार नाही.

👉 _*Ctrl + F4*_ : एकाच सॅफ्टवेअरच्या अनेक फाईल ओपन असतील तर त्या बंद करण्यासाठी या शॉर्टकटचा वापर करता येतो.

👉 _*Ctrl + Y*_ : जसे आपण Ctrl + Z याचा वापर करुन Undo करु शकतो तसेच  Ctrl + Y करुन आपण Redo करू शकतो.

👉 _*Ctrl + Shift with an arrow key*_ : संगणकावर लिखीत माहिती वाचण्यासाठी या शॉर्टकचा वापर करता येतो. यामुळे पेज सरकवणे सोपे जाते.

👉 _*Windows logo key + D*_ : या शॉर्टकटचा वापर करुन आपण सगळ्या विंडो एकाचवेळी मिनीमाईज करु शकतो. यामुळे आपला प्रत्येक विंडो मिनीमाईज करण्याचा वेळ वाचतो.

👉 _*Windows logo key + I*_ : या शॉर्टकटचा वापर करुन आपण थेट संगणकाच्या सेटींगमध्ये जातो. यामुळे संगणकाचे सेटिंग कुठे आहे हे शोधत बसावे लागत नाही.

👉 _*Windows logo key + number*_ : जर तुम्ही ॲप पिन करत असाल तर या शॉर्टकटचा वापर करुन तुम्ही ते ॲप लगेच उघडू शकता. जसे तुम्ही कॅलक्युलेटर चौथ्या क्रमांकावर पिन केले असेल तर विंडो + 4 हा शॉर्टकट वापरल्यास ते ॲप लगेच उघडते.