Pages

व्हॉटसअॅप प्रोफाइलची सुरक्षितता




 ➖➖➖🦋➖➖➖➖
     💥*विद्यार्थी विकास*💥
    ➖➖➖➖➖➖➖
      👇
 👇
 👇 👇



📡 *_व्हॉटसअॅप प्रोफाइलची सुरक्षितता_*
➖➖➖➖🦋➖➖➖➖


 🔶    _सोशल मीडियाचा वापर आता सर्वसाधारण झाला आहे. त्याचबरोबर गैरप्रकारही तितकेच वाढले आहेत. अशा वेळी आपल्या फोटोचा गैरवापर देखील होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे आपला फोटो सहजासहजी कोणाला पाहता येऊ नये किंवा डाऊनलोड करता येऊ नये, यासाठी सोशल मीडियावर आणि मोबाईलमध्ये सुरक्षिततेसंबंधी सुविधा दिल्या आहेत._

🔷 *मुलींच्या डिपीचा गैरवापर होण्याची भिती*

      _व्हॉटसअॅपवर डिपी म्हणजेच डिस्प्ले पिक्‍चरची सुरक्षिततेवरून बहुतांशी यूजर काळजीत असतात. जर आपण व्हॉटसअॅपचे डिफॉल्ट सेटिंगचा वापर करत असेल तर आपले प्रोफाईल पिक्‍चर कोणीही पाहू शकतो. जर एखाद्या व्यक्तीकडे आपला फोन नंबर आहे तर तो आपल्याला व्हॉटसअॅपशी न जोडता देखील आपला डिपी पाहू शकतो. जे यूजर आपल्या प्रायव्हसीवरून चिंतेत आहेत, त्यांनी प्रायव्हसी सेटिंग्जवर लक्ष देणे गरजेचे आहे._

🦋 *काय कराल?*

      _यासाठी सर्वांत अगोदर व्हॉटसअॅपच्या मेन्यू टॅबमध्ये जा. त्याठिकाणी आपण सेटिंगचा पर्याय निवडा. त्यानंतर अकाऊंटचा पर्याय निवडा. याठिकाणी आपल्याला प्रायव्हसीचा पर्याय दिसू लागेल. त्यावर टॅप करा. याठिकाणी आपल्याला लास्ट सिन, प्रोफाईल फोटो दिसेल. प्रोफाईल फोटोला टॅप करून आपला फोटो कोणी पाहावा यासाठी पर्याय दिलेला असतो. त्यानुसार त्याची निवड करा. शक्‍यतो संपर्कातील व्यक्तीसाठीच डिपी दिसण्याची व्यवस्था करावी. त्यानुसार सेटिंगमध्ये बदल करावा. अनोळखी किंवा अन्य व्यक्तीसाठी डिपीवर निर्बंध आणावेत._

❄ *DP सुरक्षित ठेवण्यासाठी*

      _कधी कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीला बदलेला फोटा दिसू नये असे वाटत असते. यासाठी आपल्याला प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाण्याची गरज आहे. प्रोफाईल पिकसाठी आपला कॉन्टॅक्ट हा पर्याय निवडा आणि ज्याठिकाणी आपल्याला ज्या यूजरला बदलेला फोटो दाखवायचा नाही, त्याचा नंबर आपल्या फोनबुकमधून डिलिट करा. संबंधित यूजरला आपला प्रोफाईल फोटो दिसणार नाही._

            साभार
_🙏 दैनिक लोकसत्ता