Pages

जगातील श्रीमंत



👉 _*जगातील श्रीमंत व्यक्तींचे 'हे' काम तुम्हाला माहिती आहे का?*_


जगात अनेक प्रकारचे लोक असतात. यामध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी जरी खूप मोठी असली तरी अनेक श्रीमंतांचे पाय हे जमिनीवरच असतात. असेच काही जगातील श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे अमाप पैसा आला पण तो पैसा स्वतःजवळ न ठेवता समाज हिताच्या कामासाठी वापरला. म्हणून आज अशाच काही जमिनीवर पाय असणाऱ्या श्रीमंतांविषयी जाणून घेणार आहोत.


👉 _*बिल गेट्स*_

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत आहेत. त्यांची संपत्ती 88.7 बिलियन डॉलर एवढी आहे. त्यांनी निवृत्तीनंतर ‘बिल व मेलिंदा गेट्स फौंडेशन’ची स्थापना करून जगभरातील अनेक देशांना शिक्षण, गरीबी निर्मूलन, आरोग्य यासाठी सढळ मदत केली आहे. गरीबी हाच जगाचा भयंकर रोग असून त्याचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांना वाटते. एवढचं नाही तर 2014 साली जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची नोंद करण्यात आली आहे.

👉 _*वॉरेन बफे*_

जगमान्य गुंतवणूकदार अशी ओळख असलेल्या वॉरेन बफे यांनीच ‘गिव्हींग प्लेज’ या संस्थेची स्थापना केली आहे. 63 अब्ज डॉलर्स मालमत्ता असलेले वॉरेन जगातील 3 नंबरची श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी जून 2006 मध्येच त्यांच्या संपत्तीतील 83 टक्के भाग हा ‘बिल व मेलिंडा गेट्स फौंडेशन’ला दिला असून एकाच व्यक्तीने दिलेली डोनेशनची आतापर्यंतची ही सर्वात मोठी रक्कम आहे.

👉 _*मार्क झुकेरबर्ग*_

फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग गिव्हींग प्लेजच्या यादीत यावर्षी नव्यानेच सामील झाले असून या यादीतील ते तरूण अब्जाधीश उद्योजक आहे. त्यांनीही त्यांची संपत्ती चॅरीटीसाठी देण्याचा संकल्प केला असून त्याच्या मॅक्झिमा या मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या वाट्याचे फेसबुक शेअर 99 टक्के दान देणार असल्याचे जाहीर केले आहे. आज या शेअर्सची किंमत 45 अब्ज डॉलर्स एवढी आहे.

👉 _*लॅरी एलिसन*_

ओरॅकल कॉर्पोरेशन या तंत्रक्षेत्रातील नामवंत कंपनीचे हे मालक आहेत. जगप्रसिद्ध जावा प्रोग्रॅमचे ते डेव्हलपर देखील आहेत. 51 अब्ज डॉलर्स संपत्तीचे मालक असलेल्या एलिसन यांनी गिव्हींग प्लेजमध्ये 95 टक्के संपत्ती चॅरिटीसाठी दान करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा वापर शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रासाठी केला जावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

👉 _*अझीम प्रेमजी*_

अझीझ प्रेमजी हे भारतीय आयटी कंपनी विप्रोचे अध्यक्ष आहेत. 2001 मध्ये अझीझ प्रेमजी फौंडेशनची स्थापना करण्यात आली असून त्यांनी सार्वजनिक शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. भारतातील शिक्षण क्षेत्रासाठीच ते नेहमी प्रयत्नशील आहेत. ते गिव्हींज प्लेजमध्ये म्हणतात, आमच्यापैकी ज्यांच्याकडे संपत्ती आहे ती त्यांनी जगाच्या कल्याणासाठी दान द्यावी. चांगले जग निर्माण करण्यासाठीच्या या प्रयत्नात सर्वांचे योगदान हवे ज्यामुळे कमी भाग्यवान असलेल्या लक्षावधी लोकांचे कल्याण करता येईल.