Pages

लिंक (link) आणि युआरएल (url) म्हणजे काय?





लिंक (link) आणि युआरएल (url) म्हणजे काय?

लिंक (link) आणि युआरएल (url) म्हणजे काय?

वेबसाइटवर असलेल्या प्रत्येक पानावरुन दुसऱ्या पानावर जाण्यासाठी आपण

समोर असलेल्या पानावरील त्या दुसऱ्या पानाच्या नावावर क्लिक करतो आणि मग

ते दुसरे पान उघडते. समोर चालू असलेल्या पानावरील त्या दुसऱ्या पानाच्या

नावावर माऊस नेताच तीथे हाताचे चित्र दिसते. यालाच त्या दुसऱ्या पानाची लिंक

असे म्हणतात. थोडक्यात लिंक म्हणजे एका पानावरुन दुसऱ्या पानावर जाण्याचा

मार्ग.

आपण जेव्हा एखादी वेबसाइट उघडतो तेव्हा ब्राऊझरच्या अॅड्रेसबारवर आपण त्या

वेबसाइटचे नाव देतो (उदा. www.netshika.com). सर्वसाधारणपणे आपण एखादी

वेबसाइट पाहताना एका पानावरील लिंकवरुन दुसऱ्या पानावर असे करीत ती

वेबसाइट पाहत असतो. आपण जसजसे एक लिंक पाहत असतो तस तसे त्य

ब्राऊझरच्या अॅतड्रेसबारवर आपण कुठल्या पानावर आहोत ते दिसू लागते. जसे

आता आपण या वेबसाइटच्या ज्या पानावर आहात त्या पानाची

(http://www.netshika.com/link&url.html अशी) लिंक दिसते असेल. एखाद्या

वेळेस एखादी वेबसाइट सुरुवातीपासून न पाहता आपणास जर कुणी अशी मोठी

लिंक आपल्याला दिली असेल तर त्या लिंकला लिंक एवजी युआरएल (url) असे

म्हणतात. युआरएल (url) चे पूर्ण नाव Uniform Resource Locator म्हणजेच

एखाद्या पानाचा विशिष्ट स्त्रोत. युआरएल (url) ही प्रामुख्याने एखाद्या

वेबसाइटच्या एका विशिष्ट पानावर जाण्याचा प्रत्यक्ष मार्ग.



संकलन :- नंदकिशोर फुटाणे