Pages

जवळून टीव्ही पाहणे


         

*प्रत्येक पालकाने वाचावा*
*असा अभ्यासपूर्ण लेख!!*
      👇👇👇 👇👇👇
*जवळून टीव्ही पाहिल्यास खरंच डोळे खराब होतात का?*
*एका पालकाने सायंटिफिक अमेरिकन या संकेतस्थळाला पत्र लिहून पुढील प्रश्न विचारला होता*
*पूर्वीपासून मी ऐकत आलोय की, लहान मुलांना किमान २ फुटांवरून टीव्ही पाहून द्यावा नाहीतर त्यांचे डोळे खराब होतात. आजच्या फ्लॅट स्क्रीन, एलईडी, अल्ट्रा एचडीच्या काळातदेखील हा नियम लागू होईल का?*
*आपल्यापैकी अनेकजण आणि त्यांची लहान मुले, टीव्हीच्या अगदी जवळ बसून टीव्ही बघतात, पण नशीब! त्यामुळे डोळे खराब होत नाहीत आणि आपल्याला कोणत्याही शारीरिक व्याधीदेखील जडत नाहीत.*
*ब्लॉगवर वाचा*
परंतु, हा गैरसमज का बळावला?...
याचं उत्तर शोधायला आपल्याला *१९६०* च्या दशकात डोकवावे लागेल. *सन १९६०* मध्ये अमेरिकेमध्ये *जनरल इलेक्ट्रिक* कंपनीने काही रंगीत टेलिव्हिजन संच बाजारात आणले. पण या टीव्ही संचांमधून मोठ्या प्रमाणात अमेरिकेच्या सरकारी आरोग्य विभागाने घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन करत साधारण *१०००००* पटीने जास्त किरणोत्सर्जन होई. *जीईने* तातडीने विकलेले सर्व टीव्ही परत मागवले आणि आपल्या उत्पादनात सुधारणा केली खरी!
पण, तेव्हापासून आजतागायत टेलीव्हिजन संचांवर हा कायमचा दुर्दैवी कलंक लागला.
*१९६८* नंतर बनलेल्या टेलिव्हिजन संचांमधून बाहेर पडणाऱ्या विद्युत लहरी अपायकारक नसल्या तरीही, प्रत्येकाला आपल्या डोळ्यांची काळजी असतेच! पण *डॉ. ली डफनर(अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑप्थोमोलॉजि)* यांच्यामते तुम्ही टीव्ही जवळून बघा नाहीतर लांबून त्यामुळे डोळ्यांना कसलीच इजा पोहोचत नाही.
हा!! आता तुम्ही चुकीच्या कोनात बसून किंवा जवळून बराच वेळ टीव्ही बघितला तर डोळ्यांवर ताण येऊ शकतो, डोळे थकू शकतात! पण यावर अगदीच सोपा उपाय म्हणजे, टीव्ही बंद करा आणि विश्रांती घ्या. रात्रीच्या निवांत झोपेमुळे डोळे पुन्हा ताजेतवाने होतील.
*'हाऊ स्टफ वर्क्स' संकेतस्थळाच्या *डेब्रा रोन्का* म्हणतात*.
काही पालक मुलांमधील दृष्टीदोषाचा संबंध जवळून टीव्ही पाहण्याशी लावतात. जवळून टीव्ही पाहून मुलांमध्ये *लघुदृष्टीदोष* निर्माण होत नाही! तर,उलट ज्या मुलांमध्ये *लघुदृष्टीता* असते आणि त्याचे निदान झालेले नसते अशीच मुले जवळून टीव्ही पाहत असतात असा त्यांचा होरा आहे. त्या असंही नमूद करतात की, जर तुमची मुले नेहमीच टीव्हीच्या जवळ बसून टीव्ही बघत असतील तर त्यांचे डोळे वेळीच तपासून घ्या.
साहजिकच तासनतास टीव्ही पाहिला तर, त्याचा डोळ्यांवर नाही पण मुलांच्या आरोग्यावर अप्रत्यक्ष का होईना पण परिणाम होणारच ! *नेमर्सच्या*
या संकेतस्थळानुसार जी मुलं दिवसाला ४ तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहण्यात घालवतात ती,अतिलठ्ठपणाची शिकार  होऊ शकतात व त्यामुळे भविष्यात आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे तासनतास टीव्ही बघून टीव्हीत पाहिलेल्या वाईट गोष्टींचे अनुकरण करणे तसेच, जग भयानक आहे, त्यांच्या जीवाला काही अपाय होऊ शकतो अशी नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते.  *नेमर्सच्या* अभ्यासात असेदेखील आढळून आले आहे की, मुले टीव्हीवर बघितलेल्या धुम्रपान-मद्यपानासारख्या धोकादायक गोष्टींचे अनुकरण करू शकतात, त्याचप्रमाणे टीव्हीवरील पात्रांच्या प्रभावामुळे त्यांच्यात लिंगभेदाच्या, वंशभेदाच्या भावना अधिक मजबूत होऊ शकतात.
गेल्या काही वर्षांत टीव्ही पाहण्याने लहान मुलांवर होणाऱ्या परिणामावर देखील बरेच वादविवाद चालू आहेत. जी मुले दररोज एक तास लहान मुलांसाठीच्या डीव्हीडीज अथवा व्हिडीओ पाहतात ती मुले कधीही ते व्हिडिओ न पाहणाऱ्या मुलांच्या तुलनेत सहा ते आठ नवीन शब्द कमी शिकतात असे *सिटल चिल्ड्रेन्स रिसर्च इन्स्टिट्यूट* या संस्थेने *२००७* साली केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. परंतु *२००९* च्या *चिल्ड्रन्स हॉस्पिटल, बोस्टन* येथील *सेंटर ऑन मीडिया अँड चाईल्ड हेल्थ* च्या अभ्यासात जास्त टीव्ही बघणाऱ्या मुलांवर कमी टीव्ही बघणाऱ्या मुलांपेक्षा कुठलाही नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही.
तज्ज्ञांच्या मते, मुलांचे टीव्ही बघणे हे जरी पूर्णपणे टाळता येण्यासारखे नसले तरी त्याचे नियमन हा एक मार्ग आहे. आपल्या पाल्याने काय पाहावे, किती वेळ पाहावे यासारखी निश्चित बंधने घालायला हवीत . टीव्ही हे कायम काल्पनिक विश्वात रमून जाण्यासाठी नसून नैमित्तिक मनोरंजनासाठी आहे ही गोष्ट पालकांनी आपल्या मुलांवर बिंबवण्याची गरज आहे याकडे *किड्सहेल्थ* या संकेतस्थळाने लक्ष वेधले आहे.

            ✏ *शब्दांकन*
           *नंदकिशोर फुटाणे
साभार ! ! !
लोकसत्ता
█║▌│║║█║█║▌║║█║